शेंगदाणा चिक्की - Peanuts Chikki
साहित्य :
साहित्य :
- शेंगदाणे - 250 ग्रॅम .
- गूळ किंवा साखर - 250 ग्रॅम .
- तूप - थोडेसे तूप
कृती :
- सर्वप्रथम आख्या शेंगदाण्यात थोडे पाणी टाका व चांगले ढवळून ५ मिनिटांकरिता बाजूला ठेवा . त्यानंतर तव्यावर भाजायला ठेवा . हलका रंग झालाकी शेंगदाणे खाली उतरून थंड करायला ठेवा . थंड झाले कि सोलून साल वेगळे करा .
- आता एका प्यान मध्ये थोडे तूप टाकून गरम करा . आणि त्यात गुळ बारीक करीत टाका व मध्यम आचेवर ठेवा . थोड्यावेळात गुळ वितळायला लागते . गुळाला नियमित ढवळत चला . ५ ते ६ मिनिटानंतर चमच्याने एक थेंब काढा थेंब घट्ट झाला कि तुमचे मिश्रण तयार आहे नाहीतर पुन्हा २ ते ३ मिनिटे आणखी सिजु द्या .
- आता शेंगदाणे मिश्रणात टाकून २ ते ३ मिनिटे ढवळत शिजू द्या . एका प्लेटला थोडे तूप लाऊन तातडीने मिश्रण प्लेटमध्ये टाकून पसरून घ्या . आणि चाकूच्या मदतीने हव्या त्या आकाराचे काप करून घ्या . व थंड होऊ द्या .
- तुमची खमंग शेंगदाणा चिक्की तयार आहे .
No comments:
Post a Comment