मिल्क मैसूरपाक - milk maisoor pak
साहित्य :
साहित्य :
- बेसन - १ कप
- साखर- २ कप
- तूप - २ कप
- दुध - अर्धा कप
- वेलची - ३ ते ४ ( कुटून पावडर केलेली )
कृती :
- सर्वप्रथम एका कढईत बेसन हलका तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या व शेवटी एक चमचा तूप टाकून आणखी थोड्यावेळ भाजा व बाजूला काढून ठेवा .
- आता त्याच काढईत दुध आणि साखर टाका व साखरेला वितळू द्या . घट्ट मिश्रण होईपर्यंत मिश्रणाला निरंतर ढवळीत. आता एखाद्या चमच्याने मिश्रणाचा एका थेंब एखाद्या प्लेटवर टाकून बघा थेंब घट्ट होत असेल तर तुमचे मिश्रण तयार आहे .
- आता त्यात बेसन टाका व चांगले ढवळीत सर्व गाठी काढून घ्या .
- आता ग्यास मंद करून त्यात आर्धा कप तूप टाका व निरंतर ढवळीत रहा हळू हळू मिश्रण घट्ट होते . आणि सर्व तूप मिश्रण शोषून घेते.
- आता उरलेले तूप थोडे थोडे टाकीत मिश्रण ढवळीत रहा. शेवटी मिश्रण घट्ट सोनेरी रंगाचे तयार होते .
- आता त्यात वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या .
- दरम्यान एका प्लेटला थोडे तुप लाऊन तयार ठेवा .
- मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत हलवीत रहा शेवटी तयार मिश्रणाला प्लेटमध्ये टाका व थोडे थंड होऊ ध्या . व चाकूच्या मदतीने हव्या तेवढ्या आकाराचे काप करून घ्या .
- तुमचा मिल्क मैसूर पाक तयार आहे .
No comments:
Post a Comment