आवळा मुरब्बा - Awla Murabba
साहित्य :
साहित्य :
- आवळा - १ किलो
- साखर - १,१/२ दीड किलो
- मिरे - १ छोटा चमचा (कुटून बारीक केलेले)
- केसर - काही धागे
- मीठ - चवीपुरते
कृती :
- सर्वप्रथम आवळयांना पाण्याने चांगले धून घ्या . आता एखाद्या काटेरी चमच्याच्या मदतीने त्यांना छिद्र पाडा व एका भांड्यात आवळे पूर्ण डूबेल आसे पाणी टाकून जवळ जवळ २ - ३ दिवसांकरिता झाकून ठेवा . आता आवळे बाहेर काढून चांगले धून घ्या .
- एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा , पाणी उकळल्यानंतर त्यात आवळे टाका व आणखी काही वेळ उकळू द्या .
- आत्ता उकळलेले आवळे पाण्याच्या बाहेर काढून एका भांड्यात घ्या. त्यात साखर टाका व ५ तासांकरिता बाजूला ठेवा जेणेकरून साखर वीरघडून जाईल . आता तेच पातेल आवळ्यासहित पाक बनवायला ठेवा . जेव्हा चांगले सिजून तयार होईल व पाक चांगला गाढा होईल तोपर्यंत सिजु द्या .
- तुमचा आवळा मुरब्बा तयार आहे , मुरब्बा थंड करा व त्यात मिरे , केसर, आणि मीठ टाकून चांगले मिक्स करा .
No comments:
Post a Comment