Tuesday, December 29, 2015

रसगुल्ला रेसिपी - Rasgulla


साहित्य – 1 लिटर दुध ( मलाई न काढता )
300 ग्राम साखर
2 लिंबाचा रस

कृती –

  • एक  स्वच्छ भांडे घेऊन त्यात दूध उकळून घ्यावे. जेवढा लिंबूचा रस आहे तेवढेच त्यात पाणी घाला  व लिंबाचा रस हळूहळू उकळत्या दुधात , दुध फाटे पर्यन्त टाका  आणि दुध हलवत रहा  जेव्हा दुध चांगल्या प्रकारे फाटेल  तेव्हा लिंबाचा रस टाकणे बंद करा  ,  ह्या  फाटलेले दुध एका सूती कपड्यात ओतून गाळून घ्या व ( तयार झालेल्या पनीरला ) कपड्यातच थंड पाण्याने धुवून घ्या जेणेकरून त्यातील आंबटपणा निघून जाईल.नंतर कपडा चारही बाजूंनी एकत्र गुंडाळून हाताने दाबून पाणी पूर्णपणे निथळून घ्या
  • तयार झालेला गोळा एका ताटात काढा आणि हाताने  एकजीव  होईपर्यंत मळून घ्या व त्याचे लाडूसारखे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.
  • नंतर  एका पातेल्यात साखर व  4 कप पाणी टाका आणि उकळून घ्या, उकळी आल्यानंतर त्यात तयार केलेले गोळे एक एक करून सोडा.व पातेले झाकून ठेवा , 10 -15 मिनिट रसगुल्ले शिजवून घ्या
  • तयार झालेले रसगुल्ले पाकासहित   एका भांड्यात काढून घ्या व थंड होऊ द्या, 5- 7 तासानंतर हे रसगुल्ले तुम्ही सर्व्ह करू शकता.

बेसन लाडू रेसिपी - Besan Ladoo

साहित्य -  बेसण – 250 ग्राम (2 कप)
तूप  -200 ग्राम (1 कप)
साखर  – 250 ग्राम 1 1/2 कप)
इलाइची — 8-10
काजू – 50 ग्राम (1/4 कप) एक

कृती – एका जड बुडाच्या कढईत तूप गरम करून घ्या
त्यात बेसन घालून माध्यम आचेवर बेसन  ब्राऊन रंग येपर्‍यात भाजून घ्या गाठी होऊ देऊ नका . भाजताना बेसन सतत ढवळत रहा कारण बेसन कढईच्या बुडाशी लागून करपणार नाही  बेसन  भाजल्यावर  भांडे खाली उतरवा. हे बेसन गार होण्यासाठी ठेऊन द्या. बेसन थोडे कोमट झाले की त्यात साखर, विलायची  पूड घालून नीट एकत्र करा. हे मिश्रण पूर्ण गार झाल्यावर एका ताटात चांगले मळुन घ्या. . त्यात कापलेले बदाम, काजू , बेदाणे घाला आणि त्याचे लाडू वळावेत. साधारणपणे ह्याचे १५-२० लाडू होतील. हे लाडू थोडावेळ तसेच उघडे ठेवावे म्हणजे ते कोरडे होतील. एकदा का लाडू कोरडे झाले की ते हवाबंद डब्यात ठेवा. हे लाडू १५-२० दिवस चांगले राहतील.

शंकरपारा - shakarpara

पीठ ( मैदा ) - 250 ग्रॅम (2 दिड teacups )
तूप - 50 ग्रॅम ( 1/2 teacup )
साय ( Malai ) - 25 ग्रॅम ( 1/4 teacup )
साखर - 50-60 ग्रॅम ( 1/2 teacup )
दूध - 50-60 ग्रॅम ( 1/2 teacup )
खसखस  - 1 चमचे (optional )
तेल - तळण्यासाठी

कृती -


  • सर्वप्रथम साखरेला चांगले बारीक करून घ्या . 
  • आता चाळलेला मैदा , तूप, साखर आणि मलाई चांगल्या पद्धतीने ढवळून घ्या . 
  • शंकरपारे खुसखुसित होण्याकरिता एका कढईत तेल गरम करायला ठेवा, गरम झालेले तेल तयार मिश्रणात टाकून सर्व मिक्स करून घ्या . आणि दुधाच्या मदतीने त्याचा एक गोळा तयार करून त्याला चानले फेटून घ्या . व खसखस मध्ये मिक्स करून १५ ते २० मिनिटे झाकून बाजूला ठेवा . 
  • आता गोळ्याचे दोन भाग करून प्रतेकाची दिड सेंमी जाडीची पोळी लाटून घ्या . व 1 सेमी व्यासाची शंकरपारे कापून घ्या . 
  • कढईत तेल गरम करायला ठेवा आणि गरम गरम तेलात तयार झालेले शंकरपारे सोडा . ते हलके तपकिरी होईपर्यंत मध्यम आचेवर तळा . मथून मधून ते हलवीत रहा . जास्ती आचेवर शंकरपारे व्यवस्थित शिजू शकनार नाही , तर कमी आचेवर ते तेलामढेच तुटू शकतात. 
  • आता तयार झालेले शंकरपारे एखाद्या प्लेट मध्ये काढून द्या. 
  • थंड झाल्यानंतर शंकरपारे एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आणि जेव्हा इच्छा होईल तेव्हा खा . 

श्रीखंड - shrikhand

साहित्य :

  • ताजे दही - 500 ग्राम .
  • साखर - 100 ग्रॅम .(बारीक केलेली )
  • केसर  - 10-15 तुकडे 
  • दूध - 1 टेबल चमचा .
  • वेलची - 3-4 ( सोलून बारीक केलेली )
  • पिस्ता - 4-5 (चिरलेला)
  • बदाम - 4 (चिरलेला)

कृती -

  • एका रेशीम किंवा मलमल च्या कापडात ताजे दही घट्ट बांधून २ तासापर्यंत ते लटकून ठेवा . नंतर हाताच्या मदतीने सर्व पाणी पिळून घ्या . 
  • आता एका वाटीत थोडे दुध घेऊन त्यात केसर घाला आणि बाजूला ठेवा . 
  • तयार झालेले घट्ट दही आता एका भांड्यात घेऊन त्यात कुटलेली वेलाईची आणि साखर घालून मिक्स करा . 
  • तयार झालेल्या मिश्रणात केसरचे दुध टाका आणि चांगले मिक्स करून त्यात थोडा चिरलेला पिस्ता आणि बदाम टाका व उर्वरिक शेवटी सजवायला ठेवा . 
  • आता तुमचे श्रीखंड तयार आहे , तयार झालेल्या श्रीखंडाला एखाद्या वाटीमध्ये घेऊन उर्वरित बदाम आणि पिस्त्यानी सजवा व फ्रीज मध्ये जवळ जवळ दोन तासापर्यंत गोठायला ठेवा . 
  • दोन तासानंतर त्याला फ्रीज मधून काढून सर्व्ह करा . 

मुरमुरा लाडू - Murmura Ladoo

साहित्य -
  • 250 ग्रॅम मुरमुरे
  • 750 ग्रॅम गूळ
  • 3 व 1/2 कप पाणी
कृती - 
  • सर्व प्रथम मुर्मुर्याला एका कढईत जरा परतून घ्या . जेणेकरून मुर्मुर्याना थोडा कडक पण येईल 
  • आता कढईत गूळ आणि पाणी टाका व गुळ चांगला विरघळेपर्यंत कमी आचेवर शिजवा व नंतर जरा ग्यास वाढून दोन तारी सुसंगतता येईल इतके उकळा. 
  • दोन तारी सुसंगतता येताच त्यात त्वरीत मुरमुरे मिक्स करा . व गॅस बंद करा . 
  • मिश्रण थोडे थंड झाल्यावर हाताला पाणी लाऊन त्याचे लहान लहान लाडू करा . 
  • थोडे थंड होऊ द्या व नंतर सर्व करा . 

खोब्र्याच्या वड्या - coconut barfi


साहित्य :
  • 1 कोरडे नारळ ( खवलेले )
  • ५ ते ६ सोलून वेलची पूड
  • 300 gm साखर ( पावडर केलेली )
  • 2 ते 3 टिस्पून तूप
  • केशर 1 चिमूटभर , ठेचून किंवा केशर पावडर 2 ते 3 चिमूटभर (ऐच्छिक)
  • 8 ते 10 काजू तुकडे ( पर्यायी)
  • दुध - १ कप 
कृती :
  • सर्वप्रथम एका भांड्यात दुध गरम करून घ्या. 
  • आता त्यात खवलेले नारळ चांगले ढवळून त्याला एका तासाकारिता बाजूला ठेवा. 
  • आता एका भांड्यात तुप टाकून जरा गरम झाल कि त्यात पाणी व साखर टाकून दोन तारी चाचणी तयार करा . 
  • त्यात नारळाचे मिश्रण टाकून चांगले ढवळा, आता एका पसरट भांड्याला थोडे तूप लाऊन तयार मिश्रण टाका व व्यवस्थित पसरून घ्या. 
  • थोड्या केसरच्या वा काजूच्या तुकड्यांनी जरा सजवा व थंड व्हायला बाजूला ठेवा . 
  • थंड झाले कि तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे काप  करून अलगत वेगळे करा . 
  • आता तुमच्या खोब्र्याच्या वड्या तयार आहेत , तुम्ही यांना एका हवा बंद डब्यात भरून हवे तेव्हा खाऊ शकता . 

उकडीचे मोदक - ukadiche modak

उकडीचे मोदक - ukadiche modak

साहित्य :
पोळी बनविण्याकरिता
  • 1 कप तांदळाचे पीठ
  • 1.5 कप पाणी
  • ¼ टिस्पून तेल किंवा तूप
  • मीठ एक चिमूटभर
मोदक भरणा बनविण्याकरिता 
  • 1 कप किसलेलं ओलं खोबरं 
  • ¾ कप चूर्ण किंवा किसलेले गूळ ( किंवा आव्श्क्तेनुसार )
  • 3 ते 4 वेलची ठेचून बारीक पावडर केलेली 
  • जायफळ पावडर
  • दिड टिस्पून खसखस
  • दिड टिस्पून तूप किंवा तेल
  • दिड चमचा तांदूळ पिठ (पर्यायी)
कृती :

  • एका कढइत तूप गरम करून खसखस, जायफळ व वेलीची पावडर टाकून चांगले परतून घ्या . आता त्यात किसलेलं नारळ व गुळ टाका .चांगले मिक्स करून मिश्रण जरा कोरडे होईपर्यंत मंद आचेवर शिजू द्या . व नंतर ग्यास'बंद करा . व थंड करायला बाजूला ठेवा . 
  • आता एका भांड्यात थोडे तेल टाकून गरम करायला ठेवा , तेल गरम झाल कि त्यात पाणी आणि मीठ टाका व एक उकडी येईपर्यंत सिजु द्या . 
  • पाण्याला उकळी आली कि त्यात तांदळाचे पीठ थोडे थोडे पीठ टाकीत ढवळा व ग्यास बंद करा . व थंड करायला बाजूला ठेवा . 
  • थंड झाल्यानंतर तयार मिश्रणाला एका पसरट भांड्यात घेऊन चांगले मळून एक गोळा तयार करा . 
  • आता या गोळ्याचे हव्या त्या आकाराचे लहान लहान गोळे करा . 
  • आता एका भांड्यात पाणी टाकून उकडायला ठेवा . 
  • हाताला थोडे तेल लाऊन बोटांच्या मदतीने गोळ्यांना जरा चापट करा व त्यात आगोदर तयार केलेले गुळाचे मिश्रण भरून गोळ्याला मोदकाचा आकार द्या . तयार मोदक पाणी उकडायला माद्लेल्या भांड्यामध्ये बसेल अश्या पसरत भांड्यामध्ये ठेवा . 
  • आता पाणी उकडायला लागले असल्यास त्यात एखाद पातेले पालथे ठेवा जेणेकरून आपल्या मोदकाचे भांडे अलगत राहील . 
  • आता मोदकाचे पातेले उकडी आलेल्या भांड्यात अलगत ठेवा व १० ते १५ मिनिटे झाकण ठेऊन वाफून घ्या . 
  • हे आपले उकडीचे मोदक तयार आहेत . 

पुरण पोळी - puran poli recipe

पुरण पोळी - puran poli recipe

साहित्य :

पुरण बनविण्याकरिता
  • 1 कप बारीक केलेला गुळ 
  • 1 कप चणाडाळ/हरभरा डाळ 
  • 3 कप पाणी
  • 2 टिस्पून तूप
  • 1 चमचा बडीशेप पावडर
  • ¾ ते 1 टीस्पून सुंठ पावडर
  • दिड टीस्पून वेलची पावडर किंवा 4-5 वेलच्या बारीक ठेचून
  •  ¼ टिस्पून जायफळ पावडर
पोळी बनविण्याकरिता 
  • २ कप गव्हाचे पीठ
  • 1 टीस्पून तेल किंवा तूप
  • दिड टिस्पून मिठ किंवा आवश्यकतेनुसार 
  • ¼ चमचा हळद
  • पुरण पोळी तळण्यासाठी तेल किंवा तूप आवश्यकतेनुसार 
कृती :
  • सर्वप्रथम चणाडाळ चांगले पाण्याने धून घ्या . व एका प्रेशर कुकर मध्ये पाणी टाकून ६ ते ७ शिट्ट्या होईपर्यंत सिजून घ्या . कुकर थंड झाला कि पाणी काढून घ्या . 
  • एका कढईत तूप गरम करायला ठेवा . तूप गरम झाले कि त्यात सुंठ, जायफळ, वेलची पावडर व बडीशेप पावडर टाकून काही सेकंद परतून घ्या . 
  • आता त्यात चणाडाळ आणि गुळ टाकून चांगले मिक्स करून घ्या व सर्व मिश्रण जरा कोरडे होईपर्यंत मंद आचेवर शिजू द्या. 
  • मधून मधून मिश्रण हलवीत रहा . मिश्रण जरा कोरडे झाले कि ग्यास बंद करा . 
  • थंड झाल्यानंतर पुरणाला चांगले बारीक वाटून घेऊन बाजूला ठेवा . 
  • आता एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात मिठ टाकून चांगले मिक्स करून घ्या . 
  • थोडे पाणी आणि तूप टाकून मिक्स करा व थोडे थोडे पाणी टाकीत एक गोळा तयार करा . 
  • तयार गोळ्याला १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा . 
  • पुरण पोळी लाटायला घ्या , तयार गोळ्यामधून मध्यम आकाराचा तुकडा तोडून कोर्पाटाला थोडे पीठ लाऊन मध्यम आकाराची पोळी लाटा आणि मध्य भागी पुराणाचे मिश्रण टाकून सभोतालच्या कडा जोडून थोड्या आणखी पिठामध्ये घोळून पोळी लाटायला घ्या . व एक मध्यम आकाराची पोळी लाटून घ्या . 
  • आता तवा जरा गरम करायला ठेवा , तवा गरम झाला कि त्यावर थोडे तूप टाका व पोळी त्यावर टाका . 
  • एक बाजू हलकी तपकिरी झाली कि पोळीला पलटवा व दुसरी बाजू हलका तपकिरी रंग येयीपर्यंत भाजून घ्या . 
  • तुमची गरमा गरमा पुरण पोळी तयार आहे , हि तुम्ही दुध , तूप वा दह्यासोबत सर्व करू शकता . 

मोतीचूर लाडू - motichoor ladoo recipe

मोतीचूर लाडू  - motichoor ladoo recipe

साहित्य :
  • ४ कप बेसन ( थोडे जाड दळलेले )
  • २ ते ३ कप साखर 
  • १ किलो तेल वा तूप 
  • पाणी (आव्शाक्तेनुसार )
  • काजू किंवा सुका मेवा (पर्यायी )
  • चिमुटभर लाडू रंग (पर्यायी)
कृती :
  • सर्वप्रथम बेसन पाण्यात टाकून मध्यम आसे मिश्रण तयार करून घ्या . मिश्रण खूप जास्ती घट्ट किंवा खूप जास्ती पातळ होता कामा नये . तुम्ही या मिश्रणात लाडू रंग सुद्धा टाकू शकता . 
  • आता एका कढईत तेल गरम करायला ठेवा . तेल गरम आले किंवा नाही हे तपासण्याकरिता थोडे मिश्रणाचे थेंब त्यात टाकून बघावे . थेंब वर येत असतील तर तेल आता बुंदी काढायला तयार आहे. 
  • बुंदी काढावयाचा झारा किंवा एखादा बारीक चिद्  असलेला झारा घ्या व त्याला कढईवर पकडून थोडे मिश्रण टाका व झर्याला वर खाली करीत राहा जेणेकरून बुंदीचे थेंब व्यवस्थित तेलामध्ये पडेल . तेलामध्ये सर्व बुंदी दुबेल एवढेच थेंब त्यात सोडा . 
  • आता बुन्दीला हलका तपकिरी रंग येईपर्यंत तळून घ्या . व तेलाच्या बाहेर काढून एखाद्या भांड्यात जमा करा . 
  • आता एका भांड्यात १ ते १. ५ कप पाणी आणि साखर टाकून ग्यासवर पाक बनवायला ठेवा . जवळ जवळ एक तारी पाक तयार करा . व भांडे खाली उतरावा . 
  • थंड झालेल्या बुन्दिमध्ये काजू किंवा सुका मेवा चांगला  मिसळून घ्या . एक दोन चमचे पाक टाकीत लाळू बनवायला घ्या . 
  • तुमचे मोतीचूर लाडू तयार आहेत . 

करंजी - karanji recipe

करंजी  - karanji recipe

साहित्य :
  • दिड कप बारीक खवलेले नारळ
  • 1 टेस्पून पांढरा तिळ
  • 8 ते 9 बदाम
  • 9 ते 10 काजू
  • 9 ते10 सोनेरी मनुका
  • 4 हिरव्या वेलच्या, कुटून बारीक पूड केलेला,
  • 3 टेस्पून  किंवा आवश्यकतेनुसार साखर, चांगली बारीक करून घेतलेली 
  • एक चिमूटभर जायफळ पावडर
  • दिड टेस्पून तूप
कारंजी आवरानाकरिता :
  • 2 कप मैदा
  • 2 टेस्पून तूप
  • ¼ टिस्पून मिठ
  • दिड कप ते एक  टेस्पून दूध किंवा आवश्यकतेनुसार 
कृती :
  • सर्वप्रथम नारळ भाजायला एका प्यान मध्ये तूप गरम करायला ठेवा . तूप गरम झाले कि त्यात खवलेले नारळ टाका व हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या . भरलेल्या नारळाला बाजूला काढून ठेवा व त्याच प्यान मध्ये तीळ भाजायला घ्या . तीळ रंग बदलताच त्याना बाजूला काढून घ्या . 
  • आता मिक्सर ग्राईडर मध्ये बदाम, काजू , बेदाणे थोडे बारीक करून घ्या . 
  • आता एका भांड्यामध्ये नारळ , तीळ , व बदाम , काजू व बेदाणे मिक्स करून घ्या . 
  • आता मिश्रणात साखर, जायफळ , आणि विलायची पावडर टाकून चांगले मिक्स करून घ्या . व बाजूला ठेवा . 
  • बाहेरील आवरण बनविण्याकरिता एका प्यान मध्ये हलके गरम करायला ठेवा . 
  • एका भांड्यामध्ये मैदा घ्या , त्यात तूप आणि मीठ टाका . व चांगले मिक्स करून घ्या . 
  • आता त्यात थोडे थोडे दुध टाकत मळीत एक मऊ  असा गोळा तयार करा व १५ ते २० मिनिटांकरिता बाजूला ठेवा . 
  • मोठ्या गोळ्याचा थोडासा तुकडा तोडून पोळी लाटायला घ्या . 
  • आता दोन ते तीन चमचे नारळाचे मिश्रण पोळीच्या मध्य भागी ठेवा . पोळीचे काठ मोकळे राहील याची दक्षता घ्या . 
  • बोटांच्या मदतीने थोडे पाणी पोळीच्या काठाला लाऊन घ्या . व हलक्या हाताने दोन्ही काठ जोडा, बोटाच्या मदतीने काठ चांगले दाबीत पोळीला करंजीचा आकार द्या . 
  • एका काढइत तेल गरम करायला ठेवा . व हलक्या हाताने तयार कारंजी गरम तेलात सोडा . व हलका सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्या . 
  • आता गरमा गरम करंजी तयार आहेत . 

नारळाचे लाडू - Naralache Ladu

नारळाचे लाडू - Naralache Ladu
साहित्य :
  • 1 कोरडे नारळ ( खवलेले )
  • ५ ते ६ सोलून वेलची पूड
  • 300 gm साखर ( पावडर केलेली )
  • १ ते १.५ कप दुध 
  • 2 ते 3 टिस्पून तूप
  • केशर 1 चिमूटभर , ठेचून किंवा केशर पावडर 2 ते 3 चिमूटभर (ऐच्छिक)
  • 8 ते 10 काजू तुकडे ( पर्यायी)
कृती :
  • सर्वप्रथम एका भांड्यात दुध गरम करून घ्या. 
  • आता त्यात खवलेले नारळ चांगले ढवळून त्याला एका तासाकारिता बाजूला ठेवा. 
  • आता एका भांड्यात तुप टाकून जरा गरम झाल कि त्यात पाणी व साखर टाकून दोन तारी चाचणी तयार करा . 
  • त्यात नारळाचे मिश्रण टाकून चांगले ढवळा, आता एका पसरट भांड्याला थोडे तूप लाऊन तयार मिश्रण टाका व व्यवस्थित पसरून घ्या. 
  • थोड्या केसरच्या वा काजूच्या तुकड्यांनी जरा सजवा व थंड व्हायला बाजूला ठेवा . 
  • थंड झाले कि तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे हाताच्या मदतीने लाडू बनवायला घ्या . . 
  • आता तुमचे नारळाचे लाडू  तयार आहेत , तुम्ही यांना एका हवा बंद डब्यात भरून हवे तेव्हा खाऊ शकता .