Friday, January 22, 2016

गाजर बर्फी - Carrot Burfi Recipe

गाजर बर्फी - Carrot Burfi Recipe

साहित्य :
  • गाजर - ५०० ग्राम 
  • क्रीम दुध - १ लिटर 
  • वेलची - ५ ते ६ ( कुटून बारीक पावडर केलेली )
  • तूप - १०० ग्राम 
  • साखर - २५० ग्राम किवा आव्श्क्तेनुसार 
  • काजू - ५० ग्राम ( तुकडे केलेले )
कृती :
  • सर्वप्रथम गाजर चांगले धून घेऊन बारीक किस करून घ्या . 
  • एका भांड्यात दुध गरम करायला ठेवा दुध गरम झाले कि त्यात गाजर टाका व दुध पूर्णतः आटे पर्यंत शिजू द्या . मधन मधन ढवळत चला जेणेकरून गाजर खाली लागणार नाही . 
  • गाजर मिश्रण चांगले घट्ट झालेकी त्यात वेलची पावडर, निम्मे काजू व तूप टाकून निरंतर ढवळीत थोड्यावेळ सिजु द्या . 
  • आता त्यात साखर टाका व चांगले मिक्स करा . साखरेचे पाणी पूर्ण आटेपर्यंत मिश्रणाला निरंतर ढवळीत राहा . 
  • दरम्यान एका प्लेटला थोडे तूप लाऊन गुळगुळीत करा . मिश्रण चांगले घट्ट झालेकी ते या प्लेटमध्ये पसरवा व उरलेल्या काजूच्या तुकड्यांनी सजवा . व थंड व्ह्यायला बाजूला ठेवा . 
  • मिश्रण थंड झाले कि चाकूच्या मदतीने हव्या त्या आकाराचे काप करून वेगळे करा . 
  • तुमची गाजर बर्फी तयार आहे . 

No comments:

Post a Comment