Friday, January 22, 2016

गाजर बर्फी - Carrot Burfi Recipe

गाजर बर्फी - Carrot Burfi Recipe

साहित्य :
  • गाजर - ५०० ग्राम 
  • क्रीम दुध - १ लिटर 
  • वेलची - ५ ते ६ ( कुटून बारीक पावडर केलेली )
  • तूप - १०० ग्राम 
  • साखर - २५० ग्राम किवा आव्श्क्तेनुसार 
  • काजू - ५० ग्राम ( तुकडे केलेले )
कृती :
  • सर्वप्रथम गाजर चांगले धून घेऊन बारीक किस करून घ्या . 
  • एका भांड्यात दुध गरम करायला ठेवा दुध गरम झाले कि त्यात गाजर टाका व दुध पूर्णतः आटे पर्यंत शिजू द्या . मधन मधन ढवळत चला जेणेकरून गाजर खाली लागणार नाही . 
  • गाजर मिश्रण चांगले घट्ट झालेकी त्यात वेलची पावडर, निम्मे काजू व तूप टाकून निरंतर ढवळीत थोड्यावेळ सिजु द्या . 
  • आता त्यात साखर टाका व चांगले मिक्स करा . साखरेचे पाणी पूर्ण आटेपर्यंत मिश्रणाला निरंतर ढवळीत राहा . 
  • दरम्यान एका प्लेटला थोडे तूप लाऊन गुळगुळीत करा . मिश्रण चांगले घट्ट झालेकी ते या प्लेटमध्ये पसरवा व उरलेल्या काजूच्या तुकड्यांनी सजवा . व थंड व्ह्यायला बाजूला ठेवा . 
  • मिश्रण थंड झाले कि चाकूच्या मदतीने हव्या त्या आकाराचे काप करून वेगळे करा . 
  • तुमची गाजर बर्फी तयार आहे . 

Thursday, January 21, 2016

चिरोटे - Chirote

चिरोटे - Chirote

साहित्य :
  • मैदा - २०० ग्राम 
  • तूप - २०० ग्राम 
  • साखर - १०० ग्राम ( कुटून बारीक पावडर केलेली )
  • मीठ - चिमुटभर 
कृती :
  • एका भांड्यामध्ये मैदा घ्या त्यातला थोडासा एका वाटीत काढून ठेवा . उरलेल्या मैद्याम्ध्ये चिमुटभर मीठ टाका व थोडे थोडे तूप टाकीत मैदा भिजवा, जवळ जवळ १०० ग्राम तूप टाकल्या नंतर थोड्याश्या पाण्याच्या मदतीने मैदा चांगला मळून घ्या . व आर्ध्या तासाकरिता झाकून बाजूला ठेवा . 
  • आता मैदा आणखी थोडासा माळून घेऊन गुळगुळीत आसा गोळा तयार करा . त्याचा थोडासा भाग तोडून थोडी पातळ पोळी लाटायला घ्या . पोळी कोरपाटाला चिपकेल नाही या साठी थोडे तूप लाऊ शकता . तयार पोळी एका प्लेट मध्ये जमा करा . अस्याच ३ पोळी तयार करा . 
  • एका प्याल्या मध्ये उरलेला मैदा घ्या त्यात थोडे तूप टाकून पातळ आसे म,ईश्रण तयार करा . आता एक पोळी घ्या त्यावर एक छोटा चमचा मैद्यचे पातळ मिश्रण पसरवा व त्यावर दुसरी पोळी टाका . त्यावर सुद्धा मैद्याचे एक छोटा चमचा मिश्रण पसरवा व तिसरी पोळी ठेवा . 
  • आता पोळीला रोल करा व चाकूच्या मदतीने हव्या तेवढ्या आकाराचे तुकडे करा . तयार तुकड्यांना आतल्या बाजूने बोटांच्या मदतीने थोडे दाबून एका प्लेटमध्ये जमा करा . 
  • एका कढईत तेल गरम करायला ठेवा . तेल मध्यम गरम झाले कि तयार चिरोटे कढईत मावेल तेवढे तळायला टाका. मधन मधन पालटवीत रहा , चिरोटयांचा सोनेरी रंग झाला कि एका प्लेटमध्ये जमा करा व त्यावर छोट्या चमच्याच्या मदतीने चिरोटयांना पलटवित बारीक केलेली साखर टाका. जेणेकरून साखर चानली त्यांना चीपकेल . 
  • तुमचे कुरकुरीत चिरोटे तयार आहेत , त्यांना साखरेच्या बाहेर काढून एका प्लेटमध्ये जमा करा . 

Tuesday, January 19, 2016

जिलेबी - jilebi

जिलेबी - jilebi

साहित्य :
  • मैदा - २५० ग्राम 
  • दही - २०० ग्राम 
  • साखर - ५०० ग्राम 
  • जिलेबी रंग - १/४ छोटा चमचा (पर्याई )
  • तेल - आव्श्क्तेनुसार 
कृती :
  • एका भांड्यात मैदा आणि दही घ्या . व मैद्याला सर्व गाठी विरघडेल आसे फेटा , आवश्यक असल्यास थोडे पाणी टाकू शकता . थोड जाड मिश्रण तयार करायचं आहे . या मिश्रणाला जवळ जवळ एक रात्र झाकून बाजूला ठेवा . 
  • दरम्यान एका भांड्यात साखर टाका व एक ते दीड कप पाणी टाकून चाचणी बनवायला ठेवा . साखर पूर्णतः वीरघडू द्या व एक तारी चाचणी तयार करा . व ग्यास बंद करा . 
  • एका प्याल्याम्ध्ये एक छोटा चमचा पाणी घ्या व त्यात जिलेबी रंग टाका . रंग पूर्णतः विरघडल्यानंतर तो मिश्रणात टाकून मैद्याच्या मिश्रणाला पुन्हा चांगले फेटून घ्या .एखादा सुती कपडा घ्या व त्याला छोटेसे छिद्र पाडा , अथवा जिलेबी मेकर डब्बा सुध्दा घेऊ शकता . त्यात थोडे मिश्रण टाका 
  • एका कढईत तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झाले कि जिलेबी माकेरला कढईवर उलटे पकडा व कढईत मावेल येवढ्या जिलेबी पिळून घ्या . जीलेबिंना हलका तपकिरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने तळा व तेलातून काढून चाचणीमध्ये टाका . १ ते २ मिनिटे चाचणीमध्येच राहू द्या . व नंतर बाहेर काढून गरमा गरम सर्व करा . 

Sunday, January 17, 2016

काजू कतली - Kaju Katali

काजू कतली - Kaju Katali

साहित्य :
  • काजू - २५० ग्राम 
  • साखर - १०० ग्राम ( किंवा आव्श्क्तेनुसार )
  • तूप - १ मोठ चमचा 
  • वेलची - २ ते ३ कुटून बारीक केलीली (पर्याई )
  • केसर - ४ ते ५ भागे (पर्याई )
कृती :


  • सर्वप्रथम केसरच्या धाग्यांना १ छोट्या चमचा पाण्यामध्ये २ ते ३ मिनिटा करिता बाजूला ठेवा . दरम्यान काजूला मिक्सी मध्ये चांगले बारीक पावडर करून घ्या . 
  • आता एका प्यान मध्ये ४ ते ५ छोटे चमच पाणी टाकून त्यात साखर टाका व साखर पूर्णतः विर्घडे पर्यंत १ ते २ मिनिटे शिजवा . आता त्यात काजू पावडर, वेलची पावडर आणि केसर चे धाग्यासहित पाणी टाका  टाका . व मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंतनिरंतर ढवळीत शिजवा . आता ग्यास बंद करा . 
  • तयार मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थोडे थोडे तूप टाकित आणि थोडे हाताला सुद्धा तूप लाऊन मिश्रणाचा घट्ट गोळा तयार करा . 
  • तयार गोळ्याला एखाद्या पसरट प्लेटला तूप लाऊन एक साधारण आकाराची थोडी जाळी पोळी लाटून घ्या . व चाकूच्या मदतीने हव्या त्या आकाराचे काप करून बाजूला ठेवा . 
  • तुमची काजू कतली तयार आहे . 

Thursday, January 14, 2016

गाजर हलवा - Gajar Halva

गाजर हलवा - Gajar Halva

साहित्य :
  • गाजर - १ किलो 
  • साखर - २०० ते ३०० ग्राम 
  • दूध - १०० मिली 
  • वेलची - ५ ( कुटून बारीक पावडर केलेली )
  • तूप - १ मोठा चमचा 
  • काजू - २० ग्राम ( तुकडे केलेले )
  • मनुका - २० ग्राम 
कृती :
  • सर्वप्रथम गाजरांना छिलून चांगले धुन घ्या . व बारीक कीस करा . 
  • एका कढईत तूप टाका तूप गरम झाले कि त्यात किसलेले गाजर व दुध टाका . व मंद आचेवर शिजू द्या . मधून मधून हलवीत रहा . 
  • गाजर पुर्णतः नरम होईपर्यंत शिजवा , गाजरांचा रंग हलका गर्द झाला कि त्यात वेलची , काजू आणि मनुका टाका व आणखी २ ते ३ मिनिटांकरिता हलवीत शिजू द्या . 
  • तुमचा गाजरचा हलवा तयार आहे . 

तिळाचे लाडु - Tilache Ladoo

तिळाचे लाडु - Tilache Ladoo

साहित्य :

  • तीळ - २५० ग्राम 
  • शेंगदाणे - २०० ग्राम 
  • गुळ - २५० ग्राम 
कृती :



  • सर्वप्रथम तीळ एका कढईत थोडी तपकिरी होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या . व बाजूला काढून ठेवा . आता त्याच कढईत शेंगदाणे भाजायला घ्या थोडे गर्द रंग झाला कि ग्यास बंद करा व थंड होऊ द्या . 
  • दरम्यान तीळ एखाद्या खलात थोडी कुटून घ्या व बाजूला काढून ठेवा . शेंगदाणे थंड झाले कि त्यांचे साल कडून शेंगदाणे वेगळे करा . व तेही खलात थोडे मध्यम कुटून घ्या . व बाजूला काढून ठेवा . 
  • आता गुळ सुद्धा खालामध्ये बारीक करा . 
  • एका भांड्यामध्ये सर्व मिश्रण म्हणजे तीळ , शेंगदाणे व गुळ टाकून चांगले मिक्स करा . आता त्या मिश्रणाचा थोडासा भाग हातात घेऊन लाडू बनवायला घ्या . 
  • तुमचे तिळाचे लाडू तयार आहेत , सर्व साहित्य खालत बारीक केल्यामुळे लाडवांना एक वेगळीच चव येते .  

Wednesday, January 13, 2016

आवळा मुरब्बा - Awla Murabba

आवळा मुरब्बा  - Awla Murabba

साहित्य :
  • आवळा - १ किलो 
  • साखर - १,१/२ दीड किलो 
  • मिरे - १ छोटा चमचा (कुटून बारीक केलेले)
  • केसर - काही धागे 
  • मीठ - चवीपुरते 
कृती :
  • सर्वप्रथम आवळयांना पाण्याने चांगले धून घ्या . आता एखाद्या काटेरी चमच्याच्या मदतीने त्यांना छिद्र पाडा व  एका भांड्यात आवळे पूर्ण डूबेल आसे पाणी टाकून जवळ जवळ २ - ३ दिवसांकरिता झाकून ठेवा . आता आवळे बाहेर काढून चांगले धून घ्या . 
  • एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा , पाणी उकळल्यानंतर त्यात आवळे टाका व आणखी काही वेळ उकळू द्या . 
  • आत्ता उकळलेले आवळे पाण्याच्या बाहेर काढून एका भांड्यात घ्या. त्यात साखर टाका व ५ तासांकरिता बाजूला ठेवा जेणेकरून साखर वीरघडून जाईल . आता तेच पातेल आवळ्यासहित पाक बनवायला ठेवा . जेव्हा चांगले सिजून तयार होईल व पाक चांगला गाढा होईल तोपर्यंत सिजु द्या . 
  • तुमचा आवळा मुरब्बा तयार आहे , मुरब्बा थंड करा व त्यात मिरे , केसर, आणि मीठ टाकून चांगले मिक्स करा .