उकडीचे मोदक - ukadiche modak
साहित्य :
पोळी बनविण्याकरिता
साहित्य :
पोळी बनविण्याकरिता
- 1 कप तांदळाचे पीठ
- 1.5 कप पाणी
- ¼ टिस्पून तेल किंवा तूप
- मीठ एक चिमूटभर
मोदक भरणा बनविण्याकरिता
- 1 कप किसलेलं ओलं खोबरं
- ¾ कप चूर्ण किंवा किसलेले गूळ ( किंवा आव्श्क्तेनुसार )
- 3 ते 4 वेलची ठेचून बारीक पावडर केलेली
- जायफळ पावडर
- दिड टिस्पून खसखस
- दिड टिस्पून तूप किंवा तेल
- दिड चमचा तांदूळ पिठ (पर्यायी)
कृती :
- एका कढइत तूप गरम करून खसखस, जायफळ व वेलीची पावडर टाकून चांगले परतून घ्या . आता त्यात किसलेलं नारळ व गुळ टाका .चांगले मिक्स करून मिश्रण जरा कोरडे होईपर्यंत मंद आचेवर शिजू द्या . व नंतर ग्यास'बंद करा . व थंड करायला बाजूला ठेवा .
- आता एका भांड्यात थोडे तेल टाकून गरम करायला ठेवा , तेल गरम झाल कि त्यात पाणी आणि मीठ टाका व एक उकडी येईपर्यंत सिजु द्या .
- पाण्याला उकळी आली कि त्यात तांदळाचे पीठ थोडे थोडे पीठ टाकीत ढवळा व ग्यास बंद करा . व थंड करायला बाजूला ठेवा .
- थंड झाल्यानंतर तयार मिश्रणाला एका पसरट भांड्यात घेऊन चांगले मळून एक गोळा तयार करा .
- आता या गोळ्याचे हव्या त्या आकाराचे लहान लहान गोळे करा .
- आता एका भांड्यात पाणी टाकून उकडायला ठेवा .
- हाताला थोडे तेल लाऊन बोटांच्या मदतीने गोळ्यांना जरा चापट करा व त्यात आगोदर तयार केलेले गुळाचे मिश्रण भरून गोळ्याला मोदकाचा आकार द्या . तयार मोदक पाणी उकडायला माद्लेल्या भांड्यामध्ये बसेल अश्या पसरत भांड्यामध्ये ठेवा .
- आता पाणी उकडायला लागले असल्यास त्यात एखाद पातेले पालथे ठेवा जेणेकरून आपल्या मोदकाचे भांडे अलगत राहील .
- आता मोदकाचे पातेले उकडी आलेल्या भांड्यात अलगत ठेवा व १० ते १५ मिनिटे झाकण ठेऊन वाफून घ्या .
- हे आपले उकडीचे मोदक तयार आहेत .
No comments:
Post a Comment