Wednesday, January 6, 2016

मिल्क मैसूरपाक - milk maisoor pak

मिल्क मैसूरपाक - milk maisoor pak

साहित्य :
  • बेसन - १ कप 
  • साखर- २ कप 
  • तूप - २ कप 
  • दुध - अर्धा कप 
  • वेलची - ३ ते ४ ( कुटून पावडर केलेली )
कृती :
  • सर्वप्रथम एका कढईत बेसन हलका तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या व शेवटी एक चमचा तूप टाकून आणखी थोड्यावेळ भाजा व बाजूला काढून ठेवा . 
  • आता त्याच काढईत दुध आणि साखर टाका व साखरेला वितळू द्या . घट्ट मिश्रण होईपर्यंत मिश्रणाला निरंतर ढवळीत.  आता एखाद्या चमच्याने मिश्रणाचा एका थेंब एखाद्या प्लेटवर टाकून बघा थेंब घट्ट होत असेल तर तुमचे मिश्रण तयार आहे . 
  • आता त्यात बेसन टाका व चांगले ढवळीत सर्व गाठी काढून घ्या . 
  • आता ग्यास मंद करून त्यात आर्धा कप तूप टाका व निरंतर ढवळीत रहा हळू हळू मिश्रण घट्ट होते . आणि सर्व तूप मिश्रण शोषून घेते. 
  • आता उरलेले तूप थोडे थोडे टाकीत मिश्रण ढवळीत रहा. शेवटी मिश्रण घट्ट सोनेरी रंगाचे तयार होते . 
  • आता त्यात वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या . 
  • दरम्यान एका प्लेटला थोडे तुप लाऊन तयार ठेवा . 
  • मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत हलवीत रहा शेवटी तयार मिश्रणाला प्लेटमध्ये टाका व थोडे थंड होऊ ध्या . व चाकूच्या मदतीने हव्या तेवढ्या आकाराचे काप करून घ्या . 
  • तुमचा मिल्क मैसूर पाक तयार आहे . 

Tuesday, January 5, 2016

भोपळयाचा हलवा - bhoplyacha halwa

भोपळयाचा हलवा - bhoplyacha halwa

साहित्य :
  • भोपळा - १ किलो 
  • साखर - २५० ग्राम ( किंवा आव्श्क्तेनुसार )
  • दुध - २५० ml
  • खोवा - २०० ग्राम 
  • तूप - ५० ग्राम 
  • वेलची - ६ ते ७ ( कुटून बारीक पावडर केलेली )
  • मनुका - २५ ग्राम 
  • काजू - २५ ग्राम 
कृती :
  • सर्वप्रथम भोपळ्याला आतील भाग सोडून बारीक किसून घ्या . 
  • आता एका कढईत तूप टाकून जरा गरम होऊ द्या. तूप गरम झाले कि त्यात भोपळा, साखर आणि दुध टाका . व निरंतात ढवळीत सिजु द्या जेणेकरून भोपळ्यातील सर्व दुध जवळ जवळ आटून जाईल. 
  • आता त्यात खोवा , काजू आणि मनुका टाका व चांगले ढवळीत ५ ते ६ मिनिटांकरिता शिजू ध्या . 
  • नंतर त्यात वेलची पावडर टाकून चांगले मिक्स करा . 
  • तुमचा भोपळयाचा हलवा तयार आहे . ग्यास बंद करा व थंड झाला कि सर्व करा . 

Monday, January 4, 2016

मुगडाळीचे लाडू - mugachya daliche ladoo

मुगडाळीचे लाडू - mugachya daliche ladoo

साहित्य :
  • मुगडाळ - २५० ग्राम 
  • साखर - २५० ते ३०० ग्राम (किंवा आवशकतेनुसार ) वाटून बारीक केलेली 
  • तूप - २०० ग्राम 
  • बदाम - ५० ग्राम ( कुटून बारीक केलेली)
  • काजू - ५० ग्राम ( लहान लहान तुकडे केलेले )
  • वेलची - ६ ते ७ ( कुटून बारीक पावडर केलेली )
कृती :
  • सर्वप्रथम डाळीला एका भांड्यामध्ये घ्या व डाळ पूर्ण डुबेल येवढे पाणी टाकून ५ तासाकरित भिजत ठेवा . नंतर डाळीला पाण्यातून काढून स्वच्छ धून घ्या व सर्व पाणी काढून मिक्सर मधून थोडी जाडसर बारीक करून घ्या. 
  • आता एका प्यान मध्ये तूप गरम करायला ठेवा , तूप थोडे गरम झाले कि त्यात डाळ टाका व चमच्याने निरंतर ढवळीत मध्यम आचेवर जवळ जवळ ३० मिनिटे भाजा . हळू हळू डाळीचा रंग बदलू लागतो . रंग थोडा तपकिरी झाला कि ग्यास बंद करा . व थंड व्हायला बाजूला ठेवा . 
  • आता थंड झालेल्या मिश्रणात साखर, बदाम , काजू आणि वेलची पावडर टाकून चांगले मिक्स करा . 
  • आता थोडे मिश्रण हातात घेऊन लाडू बनवायला घ्या . व एका प्लेटमध्ये जमा करा 

Sunday, January 3, 2016

शेंगदाणा चिक्की - Peanuts Chikki

शेंगदाणा चिक्की - Peanuts Chikki
साहित्य :
  • शेंगदाणे - 250 ग्रॅम .
  • गूळ किंवा साखर - 250 ग्रॅम .
  • तूप - थोडेसे तूप 
कृती :
  • सर्वप्रथम आख्या शेंगदाण्यात थोडे पाणी टाका व चांगले ढवळून ५ मिनिटांकरिता बाजूला ठेवा . त्यानंतर तव्यावर भाजायला ठेवा . हलका रंग झालाकी शेंगदाणे खाली उतरून थंड करायला ठेवा . थंड झाले कि सोलून साल वेगळे करा . 
  • आता एका प्यान मध्ये थोडे तूप टाकून गरम करा . आणि त्यात गुळ बारीक करीत टाका व मध्यम आचेवर ठेवा . थोड्यावेळात गुळ वितळायला लागते . गुळाला नियमित ढवळत चला . ५ ते ६ मिनिटानंतर चमच्याने एक थेंब काढा थेंब घट्ट झाला कि तुमचे मिश्रण तयार आहे नाहीतर पुन्हा २ ते ३ मिनिटे आणखी सिजु द्या . 
  • आता शेंगदाणे मिश्रणात टाकून २ ते ३ मिनिटे ढवळत शिजू द्या . एका प्लेटला थोडे तूप लाऊन तातडीने मिश्रण प्लेटमध्ये टाकून पसरून घ्या . आणि चाकूच्या मदतीने हव्या त्या आकाराचे काप करून घ्या . व थंड होऊ द्या . 
  • तुमची खमंग शेंगदाणा चिक्की तयार आहे . 

Tuesday, December 29, 2015

रसगुल्ला रेसिपी - Rasgulla


साहित्य – 1 लिटर दुध ( मलाई न काढता )
300 ग्राम साखर
2 लिंबाचा रस

कृती –

  • एक  स्वच्छ भांडे घेऊन त्यात दूध उकळून घ्यावे. जेवढा लिंबूचा रस आहे तेवढेच त्यात पाणी घाला  व लिंबाचा रस हळूहळू उकळत्या दुधात , दुध फाटे पर्यन्त टाका  आणि दुध हलवत रहा  जेव्हा दुध चांगल्या प्रकारे फाटेल  तेव्हा लिंबाचा रस टाकणे बंद करा  ,  ह्या  फाटलेले दुध एका सूती कपड्यात ओतून गाळून घ्या व ( तयार झालेल्या पनीरला ) कपड्यातच थंड पाण्याने धुवून घ्या जेणेकरून त्यातील आंबटपणा निघून जाईल.नंतर कपडा चारही बाजूंनी एकत्र गुंडाळून हाताने दाबून पाणी पूर्णपणे निथळून घ्या
  • तयार झालेला गोळा एका ताटात काढा आणि हाताने  एकजीव  होईपर्यंत मळून घ्या व त्याचे लाडूसारखे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.
  • नंतर  एका पातेल्यात साखर व  4 कप पाणी टाका आणि उकळून घ्या, उकळी आल्यानंतर त्यात तयार केलेले गोळे एक एक करून सोडा.व पातेले झाकून ठेवा , 10 -15 मिनिट रसगुल्ले शिजवून घ्या
  • तयार झालेले रसगुल्ले पाकासहित   एका भांड्यात काढून घ्या व थंड होऊ द्या, 5- 7 तासानंतर हे रसगुल्ले तुम्ही सर्व्ह करू शकता.

बेसन लाडू रेसिपी - Besan Ladoo

साहित्य -  बेसण – 250 ग्राम (2 कप)
तूप  -200 ग्राम (1 कप)
साखर  – 250 ग्राम 1 1/2 कप)
इलाइची — 8-10
काजू – 50 ग्राम (1/4 कप) एक

कृती – एका जड बुडाच्या कढईत तूप गरम करून घ्या
त्यात बेसन घालून माध्यम आचेवर बेसन  ब्राऊन रंग येपर्‍यात भाजून घ्या गाठी होऊ देऊ नका . भाजताना बेसन सतत ढवळत रहा कारण बेसन कढईच्या बुडाशी लागून करपणार नाही  बेसन  भाजल्यावर  भांडे खाली उतरवा. हे बेसन गार होण्यासाठी ठेऊन द्या. बेसन थोडे कोमट झाले की त्यात साखर, विलायची  पूड घालून नीट एकत्र करा. हे मिश्रण पूर्ण गार झाल्यावर एका ताटात चांगले मळुन घ्या. . त्यात कापलेले बदाम, काजू , बेदाणे घाला आणि त्याचे लाडू वळावेत. साधारणपणे ह्याचे १५-२० लाडू होतील. हे लाडू थोडावेळ तसेच उघडे ठेवावे म्हणजे ते कोरडे होतील. एकदा का लाडू कोरडे झाले की ते हवाबंद डब्यात ठेवा. हे लाडू १५-२० दिवस चांगले राहतील.

शंकरपारा - shakarpara

पीठ ( मैदा ) - 250 ग्रॅम (2 दिड teacups )
तूप - 50 ग्रॅम ( 1/2 teacup )
साय ( Malai ) - 25 ग्रॅम ( 1/4 teacup )
साखर - 50-60 ग्रॅम ( 1/2 teacup )
दूध - 50-60 ग्रॅम ( 1/2 teacup )
खसखस  - 1 चमचे (optional )
तेल - तळण्यासाठी

कृती -


  • सर्वप्रथम साखरेला चांगले बारीक करून घ्या . 
  • आता चाळलेला मैदा , तूप, साखर आणि मलाई चांगल्या पद्धतीने ढवळून घ्या . 
  • शंकरपारे खुसखुसित होण्याकरिता एका कढईत तेल गरम करायला ठेवा, गरम झालेले तेल तयार मिश्रणात टाकून सर्व मिक्स करून घ्या . आणि दुधाच्या मदतीने त्याचा एक गोळा तयार करून त्याला चानले फेटून घ्या . व खसखस मध्ये मिक्स करून १५ ते २० मिनिटे झाकून बाजूला ठेवा . 
  • आता गोळ्याचे दोन भाग करून प्रतेकाची दिड सेंमी जाडीची पोळी लाटून घ्या . व 1 सेमी व्यासाची शंकरपारे कापून घ्या . 
  • कढईत तेल गरम करायला ठेवा आणि गरम गरम तेलात तयार झालेले शंकरपारे सोडा . ते हलके तपकिरी होईपर्यंत मध्यम आचेवर तळा . मथून मधून ते हलवीत रहा . जास्ती आचेवर शंकरपारे व्यवस्थित शिजू शकनार नाही , तर कमी आचेवर ते तेलामढेच तुटू शकतात. 
  • आता तयार झालेले शंकरपारे एखाद्या प्लेट मध्ये काढून द्या. 
  • थंड झाल्यानंतर शंकरपारे एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आणि जेव्हा इच्छा होईल तेव्हा खा .